भिंतीवर आपटून नंतर पायाने…, पाहा कशी बनवली जाते सोनपापडी, VIDEO होतोय व्हायरल

Making of son papadi  दिवाळीदरम्यान सगळ्यांच्या घरोघरी वाटली जाणारी सर्वात फेमस मिठाई म्हणजे सोनपापडी. आता ही सोनपापडी नेमकी तयार कशी होते हे तुम्हाला जाणून घ्यायची इच्छा असेलच. पण, हा व्हिडीओ पाहून तुम्ही यावर्षी सोनपापडी खाण्यास किती इच्छुक असाल हे आता तुम्हीच तुमचं ठरवा. सध्या सोशल मीडियावर सोनपापडी बनवतानाचा एक व्हिडीओ व्हायरल होतोय, ज्यात काही लोक मोठ्या मेहनतीने हा पदार्थ बनवताना दिसतायत. पण, हा पदार्थ तयार करताना स्वच्छता कुठेय असा नेटिझन्सना प्रश्न पडला आहे.

वायरल झालेला व्हिडिओ पाहण्यासाठी

इथे क्लिक करा

व्हायरल व्हिडीओ
व्हायरल झालेल्या या व्हिडीओत सोनपापडीला लागणारं पीठ फॉईल पेपरवर घेऊन मग ते एका मोठ्या कढईत घेऊन काही लोक ते मिक्स करताना दिसतायत. सोनपापडीसाठी लागणारं साहित्य गरम केलं जातं व त्यानंतर एक माणूस एका इमारतीच्या भिंतीवर चिकटवून ते गोल गोल फिरवताना दिसतोय. हे करून झाल्यानंतर चार ते पाच जण ग्लोज न घालता हाताने ती सोनपापडी चांगली सुटसुटीत करून मळताना दिसतायत. यानंतर ती सोनपापडी एका भांड्यात ठेवून त्यावर एक झाकण ठेवून दोघं जण त्यावर उभं राहतात आणि सोनपापडी आकारात येण्यासाठी त्यावरून चालतात.

वायरल झालेला व्हिडिओ पाहण्यासाठी

इथे क्लिक करा

Leave a Comment